website, blog, internet,social site, techanical post, make money online, share market, youtube,

Breaking

hello everyone, welcome to our blog. maheshkadamtech blog provide techanical,education related post and tips tutorial.

Post Top Ad

Sunday, November 12, 2017

जे अति चहा घेतात त्यांच्यासाठी ही पोस्ट |

_*||जे अति चहा घेतात त्यांच्यासाठी ही पोस्ट ||*_ ∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆ बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मलमल, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक , tea 1 नं गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील, चहाचे दुष्परिणाम....
१. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात.

 २. भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.

३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळेमलावष्टंभ ,रक्तदाब वाढणे ,पक्षाघात यासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.

४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वात वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.

५. टपरीवर चहा अ‍‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.

६. चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (10 रू/चहा असे) वर्षाचे 7200 रू होतात. 5 वर्षाचे 36000 रू होतात.

७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’

८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.

९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

 १०. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील साखर व दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला खुपच मारक बनतो.

खरे पाहिले तर 'चहा' दारू पेक्षा ही जास्त घातक आहे पण दारू बदनाम आहे चहा नाही.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot